Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: गौण खनिजाचे अवैध उत्खनन; पोकलॅनसह दोन टिप्पर जप्त

गौण खनिजाचे अवैध उत्खनन; पोकलॅनसह दोन टिप्पर जप्त

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : सावंगी नजीकच्या पालोती परिसरात असलेल्या स्टोन क्रशरच्या खदानीवर अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन सुरु होते. यावर महसूल विभागाच्या (Revenue Department) पथकाने छापा मारला असता पोकलॅनच्या सहाय्याने अवैधरित्या उत्खनन सुरु असल्याचे दिसून आले. यात महसूल कर्मचाऱ्यांनी दोन टिप्परसह पोकलॅन मशीन जप्त केले आहे. (Letest Marathi News)

मौजा पालोती साझामधील जामठा (Wardha) शिवारातील पूजा चंद्रकांत दौंड यांच्या नावे असलेल्या शेत जमिनीमध्ये कोणतीही परवानी नसताना गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरु होते. याबाबत माहिती मिळताच जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत, बालाप्रसाद ढोणे, आशिष सहारे, विजय झाडे, देवेंद्र राऊत, तुषार शिंदे, बंडू सागर यांनी खदानीवर छापा मारला. यावेळी रुखमाई स्टोन क्रशरचे दोन टिप्पर दिसून आले.

चालकांनी दिली कबूली

अधिकाऱ्यांनी टिप्पर चालकांविरुद्ध कारवाई करुन पोकलॅनसह दोन्ही टिप्पर जप्त केले. दोन्ही टिप्पर चालकांनी अवैधरित्या उत्खनन केल्याची कबूली यावेळी अधिकाऱ्यांना दिली. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT