wardha news  saam tv
महाराष्ट्र

Wardha : वर्ध्यात लम्पी आजाराचा शिरकाव; जिल्हा प्रशासनाने केलं 'हे' आवाहन

राज्यात गाय वर्गीय जनावरांवर लम्पी आजाराने थैमान घातले आहे. यात वर्धा (Wardha) जिल्हा सुटला असताना आता येथेही या आजाराने शिरकाव केल्याने पशुपालकांत चिंता निर्माण झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha News : राज्यात गाय वर्गीय जनावरांवर लम्पी आजाराने थैमान घातले आहे. यात वर्धा (Wardha) जिल्हा सुटला असताना आता येथेही या आजाराने शिरकाव केल्याने पशुपालकांत चिंता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात लम्पीने चार जनावर बाधित झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या आर्वी आणि आष्टी तालुक्यातील काही गावात या आजाराचा शिरकाव झाला आहे. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाययोजना आखणे सुरू केले आहे.

आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा), आर्वी (शहर) आणि सावळापूर तर आष्टी तालुक्यातील वडाळा या गावात या आजाराची लागण झालेले पशू आढळून आले आहे. यामुळे या गावांना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तर या गावांच्या पाच किलोमिटर परिसरातील गावांतील पशुपालकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

हिवरा (तांडा), आर्वी शहर आणि सावळापर ता.आवी, तसेच बडाळा येथील एकूण सात गोवंशिय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग सदृष्य रोगलक्षणे आढळून आली आहेत. तसा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या गावांना बाधित तर परिसरातील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात लम्पीचे रुग्ण वाढण्याची शक्यता असून बाधित गावांसह त्यांच्या आजूबाजूच्या पाच किलोमीटर क्षेत्रातील गावातील जनावरांना लसीकरणाची मोहीम ही युद्धस्तरावर रबावली जाणार आहे. जिल्हा परिषद आणी पशुसंवर्धन विभागाला लम्पीवर उपयोजनाकरिता एक कोटी रुपयाचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.या आजारासाठी लागणारे औषधीही बोलाविण्यात आली आहे.

हिवरा (तांडा), आर्वी शहर आणि सावळापूर ता. आर्वी तसेच वडाळा या गावामधील संभाव्य उपरोक्त बाधित जनावरांचे विलगीकरण करून चारा, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था संबंधित पशुपालकांनी आणि संबंधित नगर परिषद, ग्रामपंचायतीने करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव झाल्यावर प्रशासन सतर्क झाले आहे.लम्पीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असून गोपालकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT