Wardha Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

तरीही धोकादायक प्रवास; प्रवाशांनी भरलेली बस चालक काढतोय पुराच्या पाण्यातून

तरीही धोकादायक प्रवास; प्रवाशांनी भरलेली बस चालक काढतोय पुराच्या पाण्यातून

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : जिल्‍ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाल्‍यांना पुर आला आहे. पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना देखील धोकादायक प्रवास केला जात आहे. विशेष म्‍हणजे प्रवाशांनी फुल्‍ल भरलेली राज्‍य परिवहन महामंडळाची बस (ST Bus) पुराच्‍या पाण्यातून काढण्याची रिस्‍क चालक घेत आहे. (Wardha News heavy Rain)

वर्धा (Wardha) जिल्ह्याला आज सकाळपासून दुपारपर्यंत पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. सकाळपासून बरसलेल्या पावसामुळे (Heavy Rain) जिल्ह्यातील नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अश्यातच आर्वी तालुक्याच्या वर्धमनेरी येथील नाल्याला पूर आल्याने पुलावरून पाणी असल्याने आर्वी वर्धमनेरी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या मार्गांवरील वाहतूक बंद असल्याने अनेक वाहने वाहतूक सुरळीत होण्याची वाट पाहत आहे.

प्रवाशांच्‍या जीवाशी खेळ

पुलावरून पाणी वाहत असताना देखील काही बस चालकांसह इतर चारचाकी वाहन चालक पुलावरून पाणी असतांना सुद्धा जीवघेणा प्रवास करत आहे. प्रत्येक बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असून सुद्धा बस चालक प्रवश्यांच्या जीवाशी खेळ करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

SCROLL FOR NEXT