Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : सरकारी कार्यक्रमाला खासगी निमंत्रण पत्रिका; रेल्वेच्या कार्यक्रमासाठी पुलगावात भाजपचे निमंत्रण पत्रक सोशल मीडियावर

Wardha News सरकारी कार्यक्रमाला खासगी निमंत्रण पत्रिका; रेल्वेच्या कार्यक्रमासाठी पुलगावात भाजपचे निमंत्रण पत्रक सोशल मिडीयावर

Rajesh Sonwane

चेतन व्यास

वर्धा : एरवी सरकारी कार्यक्रमाला कोणत्याही पक्षाकडून पदाधिकार्‍यांकडून स्वतंत्र निमंत्रण पत्रक बनवून पाठविल्याचे (wardha) ऐकीवात नाही. पण, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे आयोजित कार्यक्रमाबाबत पुलगाव भाजपच्यावतीने निमंत्रण पत्रक छापून खासगीरित्या वितरित करण्यात (Railway) आल्याची माहिती आहे. त्यामुळे हे निमंत्रण पत्रक वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Breaking Marathi News)

अमृत भारत स्टशेन योजनेमध्ये नागपूर विभागातील १५ रेल्वेस्थानकांमध्ये पुलगावच्या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. अमृत भारत योजनेत समाविष्ट रेल्वे स्थानकांच्या पूनर्विकासाचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. देशातील वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम होणार असून, पुलगाव येथील रेल्वे स्थानकावर सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे विभागाने बनविलेल्या पत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री यांची नाव असून सोबत जोडलेल्या मिनिट टू मिनिट कार्यक्रमानुसार तीन पाहुण्यांना आमंत्रित केल्याचं दिसते.

दुसरीकडे (BJP) पुलगाव आणि नाचणगाव येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नावाने बनविण्यात आलेल्या पत्रिकेत खासदार रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, राजेश बकाणे, संजय गाते आदी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुलगावच्या कार्यक्रमाबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे असलेली निमंत्रण पत्रके सोशल मीडियावर टाकली. त्यात विनितमध्ये दोन पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. पण, सरकारी कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अशी निमंत्रण पत्रके पाठविणे कितपत सायुंक्तिक आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हा तर राजशीष्टाचाराचा भंग
केंद्र सरकारकडून रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये रेल्वेस्थानाकांचा विकास केला जातं आहे. या निमित्ताने आयोजित उद्घाटन सोहळ्याचा मंत्रालयाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन करतांना रेल्वे विभागाने राजशिष्टाचाराचे पालन करून स्थानिक खासदार, आमदार यांना निमंत्रण देत बोलाविले आहे. मात्र पुलगावच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वतःच पत्रिका बनवत पूर्ण प्रोटोकॉल मोडीत काढला. भाजप पदाधिकाऱ्यांनी बनविलेल्या पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चक्क खासदार यांचे नाव टाकले. तर इतर स्थानिक भाजपाचे पदाधिकाऱ्यांना उपस्थितीत दर्शविले आहे. स्थानिक आमदार व भाजपाचे विधानपरिषद आमदार यांच्या नावाचा उल्लेख पत्रिकेत करण्यात आला नाहीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा गावरान स्टाईल चविष्ट भरली वांगी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नीट पुनर्परीक्षा पार्श्वभूमीवर परभणीत परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात

Cancer- Acidity : ॲसिडीटीकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात, असू शकतो कॅन्सरचा धोका

Soaking mangoes: आंबा खाण्यापूर्वी पाण्यात का भिजवला जातो?

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT