Hinganghat Crime Saam tv
महाराष्ट्र

Hinganghat Crime: तरूणीनं भेटण्यास नकार दिल्यानं प्रियकर चिडला; पुढे घडले ते अंगाचा थरकाप उडवणारं

भेटण्यास नकार दिल्‍याने प्रियकराचा संताप; पुढे घडले ते धक्‍कादायक

साम टिव्ही ब्युरो

वर्धा : वर्धेच्या हिंगणघाट येथे भेटण्यास नकार देत फोन उचलने बंद केल्याने प्रियकराने प्रेयसीला विष (Wardha News) पाजले. इतकेच नाही तर युवकाने स्वतःही विष प्राशन केले. यानंतर दोघांनाही सेवाग्राम रूग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला. (Breaking Marathi News)

आरोपी अमन निखार याचा हिंगणघाट येथील एका युवतीसोबत प्रेम संबंध होते. दरम्यान युवतीने युवकाला भेटण्यास नकार दिला. युवकाने फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्‍न केला. मात्र युवतीने युवकाचा फोन उचलणे देखील बंद केला होता. यामुळे युवकाचा राग अनावर झाला.

घरा बाहेर निघताच साधली संधी

दरम्यान तरुणीही काही कामानिमित्त मैत्रिणीसोबत घराच्या बाहेर पडली होती. ही संधी साधत युवतीला वाटेत गाठत गाडीवर बळजबरीने बसवून निर्जनस्थळी नेले. येथे युवतीला सोबत आणलेले विषारी औषध पाजले आणी युवकाने स्वतः देखील विषारी औषध प्राशन केले. यामुळे दोघेही अत्‍यव्‍यस्‍थ झाले. दोघांनाही सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT