Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha: तळेगावच्या सिकलकरी बेड्यातून १९ धारदार शस्त्र जप्त

तळेगावच्या सिकलकरी बेड्यातून १९ धारदार शस्त्र जप्त

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : तळेगाव श्यामजीपंत येथील सिकलकरी बेड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबविले. या दरम्‍यान बादलसिंग सोनासिंग बावरी याच्या घरातून १९ धारदार शस्त्र जप्त केले. ही कारवाई पोलीस (Police) निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. (Letest Marathi News)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस बेडा (Wardha) परिसरात सर्च ऑपरेशन करीत असताना त्यांना आरोपी बादसिंग बावरी याच्याघरी शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या निवास स्थानाकडे धाव घेतली असता पोलिसांना पाहून आरोपी बादलसिंग याने पळ काढला. पोलिसांनी छापा मारुन त्याच्या निवासस्थानी तपासणी केली असता एका पिशवीत मोठा सत्तूर, १७ नग गुप्त्या असे अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवून असलेल्याचे दिसले. पोलिसांनी २ हजार ८५० रुपयांचे हत्यार जप्त करुन बादलसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT