wardha Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : दूधाचे उपकार फेडले! एकाच्या साथीने १५ वर्षांच्या मुलाने वाचवला पुरात अडकलेल्या आईचा जीव, वाचा घटनेचा थरार

wardha News : वर्ध्यात एका व्यक्तीच्या साथीने १५ वर्षांच्या मुलाने आईचा जीव वाचवला. या मुलाचं वर्ध्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Saam Tv

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha News : शेतातून घरी परतत असताना एका महिलेचा पाय नाल्यावरून जाताना अचानक घसरला. त्यानंतर महिला पुराच्या पाण्यात वाहू लागली. हे लक्षात येताच एका व्यक्तीने तात्काळ नाल्यात उडी घेतली. आईला बुडताना पाहून तिचा १५ वर्षांचा मुलगाही मदतीसाठी धावला. अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर महिलेला वाचवण्यात यश आलं. ही घटना वर्धा तालुक्यातील दहेगाव गावंडे येथे घडली.

वर्ध्यातील दहेगाव (गावंडे) येथील मारोती नेहारे यांच्या शेतात सुनंदा नागोसे, मैना नेहारे आणि रोशनी भलावी शेतात गेल्या होत्या. काम आटोपून दुपारी त्या घरी परतत होत्या. शेताच्या कुंपणाशेजारी वाहणारा नाला जोरात वाहत होता. यावेळी मजूर महिला मैना नेहारे, सुनंदा नागोसे आणि रोशनी भलावी तिघी मागे राहिल्या.

नाला ओलांडताना मैना नेहारेचा पाय घसरला. त्यानंतर नेहा पुराच्या पाण्यात वाहू लागली. रोशनी भलावीने तात्काळ मैना नेहारेचा हात पकडला. मात्र दोघीही वाहू लागल्या. हे पाहून सुनंदा नागोसेही मदतीसाठी धावली. पण तीही पाण्याच्या प्रवाहात अडकली.

तिघी महिलांना पाण्यात वाहताना पाहून हनुमान उइके या व्यक्तीने मदतीसाठी धाव घेतली आणि तात्काळ नाल्यात उडी मारली. आईला बुडताना पाहून सुनंदा नागोसेचा १५ वर्षांचा मुलगाही धावत आला. नाल्यात वाहणाऱ्या पाण्यात हनुमान उइके आणि सुनंदाचा मुलगा यांनी मिळून तिन्ही महिलांना वाचवले.

पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांचा वाचवला जीव

वाशिमच्या जोगेश्वरी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना प्रशासनाने रेस्क्यू केलं. दोघे शेतकरी दुपारपासून पुरात अडकून पडले होते. प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीमने गावात दाखल झालं. त्यानंतर या शेतकऱ्यांना पुरातून बाहेर काढले. जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नदीला पूर आला होता. यापुरात शेतीचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली पीकंही वाहून गेलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: रम्मीचा डाव उलटणार; माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद जाणार? VIDEO

Lip Filler: सिलिब्रिटी लिप फिलर्स करतात म्हणजे नेमंक काय करतात?

Maharashtra Politics : राज ठाकरे - उद्धव ठाकरे इतक्यात एकत्र येतील का? काय आहेत आव्हानं? EXPLAINED

Maharashtra Live News Update:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात पार पडणार रक्तदान शिबिर

Rajeshwari Kharat: 'एक नंबर तुझी कंबर...' राजेश्वरीच्या साडीतील फोटोवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT