A Wardha farmer wins a decade-long legal battle as parrots are recognized as wildlife, paving the way for crop damage compensation. saam tv
महाराष्ट्र

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

Compensation For Crop Damage By Parrots In India: वर्ध्यातील शेतकऱ्याने 10 वर्षांच्या लढाईनंतर पोपटांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी न्याय मिळवला. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता वन्यजीवांमुळे होणाऱ्या नुकसानीस भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Omkar Sonawane

वन्यजीव प्राण्यानं शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान केलं... त्यानंतर नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यानं थेट वनविभागाकडे धाव घेतली.. मात्र, ‘पोपट हा वन्यजीव नाही’ असं सांगत त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला... होय... 2016 मध्ये वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील हिंगणी गावातील शेतकरी महादेव डेकाटे यांच्या डाळिंब शेताचं पोपटांच्या थव्यानं मोठं नुकसान केलं...मात्र, वन विभागानं त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर न्यायासाठी अजय डेकाटे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली...

इतकंच नाहीतर पोपटामुळं शेताचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आणि यासाठी शासनानं भरीव मदत देण्याची विनंतीही त्यांनी केलीये.. या प्रकरणात प्रति झाड नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आल्याचे वकील ऋत्विक भालेराव यांनी सांगितलंय..

खरंतर, 10 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मिळालेला न्याय हा केवळ एका शेतकऱ्याचा विजय नाहीये.. तर राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. इतकंच नाहीत यापुढे वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीलाही भरपाई मिळण्याचा मार्गदेखील मोकळा झालाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

Dombivli Crime: संतापजनक! मदतीसाठी बोलावलेल्या मित्राकडूनच अनाथ तरुणीवर अत्याचार

भोंदू मनोहर भोसलेला राजकीय आश्रय? भोसलेच्या वाढदिवसाला 90 आमदारांची हजेरी?

Pune Crime : पुण्यातील खेडमध्ये गुंडांच्या टोळीचा धुडगूस, नागरिकांवर हल्ला, एकाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, VIDEO

भररस्त्यात आमदाराच्या कानफटात मारली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT