wardha crime news  saam tv
महाराष्ट्र

Wardha : जन्म दाखल्यावरुन वाद; नगरपालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण

वर्धा नगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

wardha crime news : वर्धा नगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. वर्धा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना वर्धा (Wardha) नगरपालिकेत घडली. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख (३५) हे दिव्यांग असून पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात कनिष्ठ लिपीक म्हणून नोकरीवर आहे. ते कर्तव्यावर असताना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सुजित धवराळे आणि कार्तिक पेटकर हे दोघे नगरपालिकेत आले. त्यांनी मुलांच्या जन्म प्रमाणपत्राची मागणी केली.

आवेस यांनी त्यांना थोडं थांबण्यास सांगून बाजूलाच असलेल्या मॅडमकडून प्रमाणपत्राची प्रत घेण्यास सांगितले. मात्र, दोघांनी अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हेतर जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दोघांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. सदर घटनेनंतर मोहम्मद आवेस यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दाखल केली.

दरम्यान, सदर कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा करणे, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी विविध कलमन्वये गुन्हा दाखल केलाय. आरोपींना वर्धा शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण; १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकाऱ्यांचा होणार सन्मान

प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची हत्या, लोहगडावर फिरायला नेऊन केतन अग्रवालचा घात

Maharashtra Politics: ऑपरेशन टायगरनंतर 'ऑपरेशन बीएमसी' खासदारांनंतर आता नगरसेवकही फुटणार?

Maharashtra News Live Update: पुण्यात गुजरातमधून विक्रीसाठी आणलेला गुटखा जप्त

तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! नागपूरात बनावट डॉक्टरचा पर्दाफाश, पुण्यात नकली स्किनकेअरचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT