Wardha News Saam TV
महाराष्ट्र

Wardha News : डाळ मिलमध्ये काम करणाऱ्या बालकामगाराचा मृत्यू; हौदात पडल्याने गमवावा लागला जीव

मील व्यवस्थापनाने याची कुणालाही माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha News : हिंगणघाट येथील कडाजना शिवारातील डाळ मिलमध्ये काम करणाऱ्या बालकामगाराचा हौदात पडून मृत्यू झाला. मील व्यवस्थापनाने याची कुणालाही माहिती न देता मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिंगणघाट (Wardha) पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून मिल व्यवस्थापक फरार आहे.

प्राप्त माहितीनुसार, कडाजना शिवारात मानधनिया डाळ मिल असून येथे बिहार राज्यातील दरभंगा येथील प्रभासकुमार यादव (१६) हा कामाला होता. मील परिसरातील हौदामध्ये हा बालमजूर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मृताच्या परिवाराला न देता मील व्यवस्थापनाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली.

याची माहिती मिळाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलिस (Police) अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत गुन्हा दाखल करुन कामगार अशोक पुडिया, कंत्राटदार अजित यादव व पर्यवेक्षक दिलीप असलकर या तिघांना अटक केली.

या तिघांनाही हिंगणघाट येथील न्यायालयात हजर केले असता ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दाळमिल व्यवस्थापक व संचालक मिलला टाळे ठोकून पसार झाले आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा हौदात पडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT