Wardha Crime News Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime News: धक्कादायक! प्रियकराचा लग्नास नकार; तरुणीने फिनाईल पीत खाल्ल्या ‘पॅरासिटेमॉल’च्या गोळ्या

Hinganghat News Update: आरोपीने लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र लग्नासाठी विचारले असता तरुणाने लग्न करण्यास नकार दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास...

Hinganghat News: प्रेमप्रकरणानंतर लग्नास नकार दिल्याने निराश झालेल्या तरुणीने फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ही घटना घडली आहे. पीडितेच्या मृत्यूपूर्व बयाणावरुन आरोपीविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Latest Marathi News Update)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडितेशी आरोपी अमन प्रकाश कोठारे (रा. तेलंगखेडी) याने जवळीक निर्माण करुन तिचा विश्वास संपादीत केला. तसेच तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र पिडितीने लग्नासाठी विचारले असता तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. ज्यामुळे तरुणीला मोठा धक्का बसला. या प्रकारानंतर पिडीतेने रागाच्या भरात फिनाईल पिऊन पॅरासिटेमॉलच्या २० गोळ्या व इतर गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, घटनेनंतर पीडितेला तत्काळ हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असून पोलिसांना दिलेल्या मृत्यूपूर्व बयाणात तिने झालेला प्रकार सांगितला. यावरुन हिंगणघाट पोलिसांनी आरोपी अमन कोठारे याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT