Wardha Car Accident सुरेंद्र रामटेके
महाराष्ट्र

Wardha Accident: कार पुलाखाली कोसळून सात जण ठार, भाजप आमदाराच्या मुलाचा समावेश

तुळजापूर महामार्गावरील वर्धा - देवळी मार्गावरील घटना

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा - तुळजापूर मार्गावर देवळी नजीकच्या सेलसुरा येथे मोठा अपघात झाला आहे. झायलो कार यवतमाळ (Yavatmal) येथून नागपूरकडे (Nagpur) जात असताना पुलाच्या खाली कोसळली आहे. यात भीषण अपघातात (Accident) सात तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. रात्री दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रात्रीच्या वेळीला जंगली श्वापदं वाहनासमोर आल्याने वाहन अनियंत्रित झालं आणि थेट ४० फुट खोल दरी ही कार कोसळली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत मृत्यू झालेले तरुण हे सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचंही प्राथमिक माहितीमधून समोर आली आहे.

हे देखील पहा -

सेलसुरा येथील जुना आणि नवीन पुलाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुस्कान झाले आहे. गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या अपघाताची माहिती समजताच सावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या अपघातात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा मतदार संघाचे भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले यांचा देखील मृत्यू झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT