Wardha Accident 
महाराष्ट्र

Wardha : विचित्र अपघात! डुक्कर आडवं आलं, कार टँकरला धडकली, एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

Wardha Samudrapur Car Accident : वर्ध्यात डुक्कर आडवे आल्याने कार टँकरला धडकली. या भीषण अपघातात एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. घटना मध्यरात्री तरोडा शिवारात घडली.

Namdeo Kumbhar

चेतन व्यास

Wardha Accident News : वर्ध्यामध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. डुक्कर आडवे आल्यामुळ कारचे नियंत्रण सुटले अन् टँकरला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय. अपघात इतका भीषण होता की माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. उपचारावेळी बाप-लेक दगावले. वर्धा येथील समुद्रपूर वर्धा मार्गावरील तरोडा शिवारातील मध्यरात्री १ वाजता हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या वडिलांना नागपूरला आणि मुलीला सेवाग्राम येथे उपचरासाठी दाखल केले होते. पण उपचारावेळी दोघांचीही प्राण ज्योत मालवली. प्रियंका प्रशांत वैद्य (वय 37),प्रियांश प्रशांत वैद्य (वय 8 वर्ष ),प्रशांत मधुकर वैद्य (43 वर्ष ) व माही प्रशांत वैद्य (3 वर्ष ) अशी मृतकांची नावे आहेत.

प्रशांत मधुकर वैद्य हे कारने वर्ध्याला येत होते, त्यावेळी रात्री एक वाजताच्या आसपास अपघात धाला. वैद्य यांच्या कारला अचानक डुक्कार धडकले त्यामुळे कारवरील ताबा सुटला. कार थेट जाऊन टँकरला धडकली. या अपघातामध्ये प्रियंका आणि प्रियांश यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेले प्रशांत वैद्य आणि माही यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

कारचालक प्रशांत वैद्य हे पोलीस कर्मचारी आहेत. ते वर्धा येथील वडनेर ठाण्यात कार्यरत होते. ते कुटुंबासोबत कारने तरोडा गावाजवळून कारने वर्धेला निघाले होते. त्यावेळी अचानक कारसमोर डुक्कर आडवे आले. डुकराला कारची धडक लागून कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरला जाऊन धडक दिली. घटनेत घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झालाय तर कारचालक पती व मुलगी गंभीर जखमी झाली होती. त्यांना सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला तर वडिलांचा नागपूरच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यासंदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT