Wardha Accident Saam Tv
महाराष्ट्र

भयंकर! रानडुकरांचा कळप समोर आला अन् होत्याच नव्हतं झालं...

जखमींना सावंगी रुग्णालयात केले दाखल; मृतांमध्ये लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे.

सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा

वर्धा - सात भावी डॉक्टरांचा अपघातात (Accident) मृत्यूची घटना ताजी असताना त्याच अपघाताच्या दीडशे पुन्हा एक विचित्र अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी असून एक किरकोळ जखमी आहे. जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल आले असून उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा -

अचानक रस्ता ओलांडताना रानडुकरांचा कळप समोर आला. रानडुकराला फॉरचूनर कारने धडक दिल्याने कार पलटी झाली त्यानंतर मागून येणाऱ्या एका कारने सुद्धा रानडुकरापासून वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. यात ती पलटी झाली. तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमीआहे . दोन रानडुकरे अपघातात ठार झाली आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप अपघात झालेल्या ठिकाणाची स्वतः आले आणि अपघात कसा झाला याची माहिती जाणून घेतली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT