Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: अतिवेगाने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; उड्डाणपुलावरुन पडून मृत्यू

अतिवेगाने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; उड्डाणपुलावरुन पडून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : सेवाग्रामकडून वर्ध्याकडे अतिवेगात असलेली दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. यात दुचाकीवरील (Wardha News) तरुण पुलाखाली पडल्‍याने त्‍याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक उराडे (वय ३१) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी (Accident News) अपघातस्थळी जात पंचनामा करुन नोंद घेतली. (Maharashtra News)

वर्धा येथील आदिवासी कॉलनीतील रहिवासी प्रतिक उराडे हा त्याच्या दुचाकीने सेवाग्राम येथे कामानिमित्त गेला होता. काम आटोपून तो दुचाकीने परत येत असतानाच सेवाग्राम उड्डाणपुलावर वेगात असलेल्या दुचाकीवरुन त्याचे नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी थेट पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. जोरदार धडकेत प्रतिक पुलाखाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांना अपघात झाल्याचे कळताच नागरिकांनी पुलावर धाव घेतली. तसेच सेवाग्राम पोलिसांनी अपघातस्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह सेवाग्राम येथील रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. प्रतिक हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. त्याच्या अपघाती मृत्यूने परिवारावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

SCROLL FOR NEXT