Walmik karad SIT Custody in Beed Sarpanch Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad : वाल्मिक कराडला वाचवण्यामागे पोलिसांचा हात? दमानियांचा सवाल, राजकीय बवाल, VIDEO

Walmik Karad latest News : वाल्मिक कराडला 7 दिवसांच्या सीआयडी कोठडीनंतर लगेच न्यायालयीन कोठडी मिळालीय..त्यामुळे दमानियांनी सवाल उपस्थित केले आहेत... नेमकं दमानियांनी काय म्हटलंय आणि दमानियांच्या आरोपावर धनंजय मुंडेंनी काय प्रतिक्रीया दिलीय? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Saam TV News

भरत मोहळकर, साम टीव्ही

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित असलेल्या वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी संपल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.. मात्र कराडच्या न्यायालयीन कोठडीवर अंजली दमानियांनी सवाल उपस्थित केले आहेत..तर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय...

तर कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात येत असल्याच्या दमानियांच्या प्रश्नावर मंत्री धनंजय मुंडेंनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिलाय.....

कराडला मिळतेय व्हीआयपी ट्रिटमेंट?

सरकारचा VIP कैदी कराड

वाल्मिक कराडच नाही तर विष्णू चाटेलाही तुरुंगात स्पेशल ट्रिटमेंट देत असल्याचा आरोप दमानियांनी केलाय.. विष्णू चाटेच्या चॉईसनुसार त्याला लातूर जेल देण्यात आल्याचा आरोप दमानियांनी केलाय.. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये टाकण्याची मागणी दमानियांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांकडे केलीय.. त्यामुळे रश्मी शुक्ला दमानियांची मागणी मान्य करुन आरोपींची कोंडी करणार का? याकडे लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्त्रायल-अमेरिकेच्या निशाण्यावर अयातुल्ला अली खामेनेई; आधी धमकी आता थेट घरावर हल्ला

Maharashtra Live News Update: खारघरमध्ये ‘हिंद की चादर’ कार्यक्रमात बॅनर कोसळला; महिलेला किरकोळ दुखापत

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघाती निधनाला महिना पूर्ण; 30 दिवसात बदललं राज्याचं राजकारण

Pune Crime: तरुणी लिफ्टने आठव्या मजल्यावर आली अन्...; आत्महत्येच्या घटनेनं वाघोली हादरली

Ajit Pawar Plane Crash: ट्रेनी विद्यार्थी चालवत होते 'एटीसी टॉवर'; अहवालातून बारामती विमानतळाबाबत धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT