walmik karad Saam tv
महाराष्ट्र

Walmik Karad : वाल्मिक कराडची तुरुंगात प्रकृती बिघडली; अचानक वाटू लागले अस्वस्थ, नेमकं काय झालं?

Walmik Karad Health : वाल्मिक कराडची तुरुंगात प्रकृती बिघडल्याची माहिती हाती आली आहे. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याचावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमधून मोठी बातमी हाती आली आहे. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली आहे. कराडला शनिवारी दुपारी अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी आरोपी वाल्मिक कराडला रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे. कराडच्या रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे. याच कराडची आज दुपारी प्रकृती बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. कराडला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याच्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या आहेत. रक्ताचा अहवाल आल्यानंतर त्याला पुढील उपचार करण्यात देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

बीडमध्ये आणखी एक पोलीस निलंबित

बीडमध्ये जिल्हा कारागृहातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. आरोपी वाल्मिक कराड असलेल्या जिल्हा कारागृहातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. दक्षता पथकाच्या तपासणीदरम्यान गैरप्रकार आढळला होता. या अहवालानंतर आज शनिवारीम महिला पोलीस कर्मचाऱ्यासासह तुरुंग अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी बीड्या जिल्हा कारागृहात कैद आहेत. कारागृह प्रशानावर आरोप झाले. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली. या प्रकरणानंतर वारंवार तपासणी केली जात आहे. संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याचबरोबर सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, महेश केदार हे सर्व याच कारागृहात आहेत. त्याच कारागृहातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या निलंबनाचे आज शनिवारी आदेश देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT