Wakad Crime News गोपाळ मोटघरे
महाराष्ट्र

Pimpari-Chinchwad: दहीहंडीच्या वर्गणीसाठी दादागिरी; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Crime News | दुकान मालकाकडे बळजबरीने दहीहंडीसाठी पाचशे रुपयांच्या वर्गणीची मागणी केली होती.

गोपाळ मोटघरे

पिंपरी-चिंचवड: दहशत पसरवून दुकानदाराकडे दहीहंडीच्या वर्गणीसाठी बळजबरीपूर्वक पैशाची (Money) मागणी करुन, तक्रारदाराच्या दुकानात तोडफोड करणाऱ्या आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime News)

हे देखील पाहा -

दहीहंडीची वर्गणी (Contribution) घेण्यासाठी वाकडच्या जय भवानी चौक परिसरामध्ये राहणाऱ्या काही आरोपींनी वाकड (Wakad) येथील स्नॅक्स अँड स्वीट सेंटर या दुकानात जाऊन दुकान मालकाकडे बळजबरीने दहीहंडीसाठी पाचशे रुपयांच्या वर्गणीची मागणी केली होती. मात्र दुकान मालकाने वर्गणी घेणाऱ्या आरोपींना सुरुवातीला शंभर रुपये देऊ केल्याने आरोपीने संतापून दुकानदाराला बेदम मारहाण करुन त्याच्याकडे पाचशे रुपयाची मागणी केली.

दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी त्याच्या गल्ल्यात दिवसभरातील धंद्यातील व्यवहारात जमा झालेले दहा ते बारा हजार रुपये पळवून त्याच्या दुकानात तोडफोड करत त्याच्याकडे दर महिन्याला हप्त्याची मागणी केली आहे. या प्रकरणात तक्रारदार दुकानदाराने वाकड पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर वाकड पोलिसांनी चार सज्ञान आरोपींना अटक केली आहे. तर तीन विधी संघर्षीत बालकांना सध्या ताब्यात घेतले आहे.

ज्ञानेश्वर उर्फ माऊली दामोदर उपले, मनीष मच्छिंद्रनाथ कदम, यश सतीश रसाळ, आणि प्रसाद सुभाष राऊत या चार आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

मुंबई पोलीस दलात कोट्यवधींचा महाघोटाळा! थेट पोलिसांच्याच पगारावर मारला दरोडा; मुख्य सूत्रधार अखेर अटकेत

Gold Price Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT