wai city traffic diverted on eve of kalubai devi yatra 2024 mandhargad saam tv
महाराष्ट्र

Mandhardevi Yatra 2024 : भाविकांनाे! मांढरदेव गडावर काळूबाईच्या यात्रेला निघालात? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

यंदा 25 जानेवारीस यात्रेचा मुख्य दिवस आहे.

Siddharth Latkar

Satara News :

वाई तालुक्यातील श्री क्षेत्र मांढरदेव येथील ‍श्री काळेश्‍वरी देवीच्या यात्रेनिमित्त (mandhardevi yatra 2024) सातारा पाेलिस जिल्हा दलाने 24 जानेवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत वाई (wai) शहरातील वाहतुक व्यवस्थेत काही अंशी बदल केला आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक समीर शेख यांनी नुकतेच जारी केलेत. दरम्यान मांढरदेव गडाकडे (Mandhardev Gad) जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने ‍श्री काळेश्‍वरी देवीचे मंदिर ((kalubai temple) १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मांढरदेव देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

शाकंभरी पौर्णिमे दिवशी मांढरदेवीची मुख्य यात्रा असते. या काळात भाविकांची गडावर माेठी गर्दी असते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गड आणि परिसरात विकासकामे सुरु आहेत. मांढरदेव येथील काळूबाईची वार्षिक यात्रा 24 ते 26 जानेवारी या कालावधीत आहे. यात्रा काळात भाविकांना साेयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाची नुकतीच वाई शहरात बैठक झाली. (Maharashtra News)

यंदा 25 जानेवारीस यात्रेचा मुख्य दिवस असून या निमित्त राज्यभरातून तसेच राज्याबाहेरील भाविक गडावर येत असतात. यात्रा काळात वाई शहरात वाहतुक काेंडींची समस्या निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिस दलाने 24 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या काळात वाहतुक व्यवस्थेत बदल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाईतून मांढरदेव गडासाठी एकेरी मार्ग

जाणारा मार्ग - किसनवीर चाैक - पी. आर. सायकल मार्ट - ग्रामीण रुग्णालय - दातार हाॅस्पीटल - चावडी चाैक - सूर्यवंशी चाैक ते एमआयडीसी - मांढरदेव गड.

येणारा मार्ग - एमआयडीसी मार्गे सूर्यवंशी चाैक - जामा मशिद - फुलेनगरकडे जाणार मार्ग.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

SCROLL FOR NEXT