sambhaji briged saam tv
महाराष्ट्र

Waghya Dog: वाघ्याच्या समाधीचा वाद चिघळला, छत्रपती आणि होळकर आमनेसामने वादात संभाजी ब्रिगेड आणि संभाजी भिडेंची उडी, VIDEO

Raigad fort: राज्यात पुन्हा एका नवीन वादाला सुरुवात झालीये... छत्रपती संभाजी राजेंनी रायगडवर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली होती. या प्रकरणात आता संभाजी भिडे,संभाजी ब्रिगेड यांनीही उडी घेतलीये. तर दुसरीकडे थेट राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कुटुंबातील वशंज भूषणसिंह राजे होळकरांनीही त्याला विरोध केलाय. त्यामुळे छत्रपती आणि होळकर आमनेसामने आलेत पाहूया...

Tanmay Tillu

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी असावी किंवा नाही यावरुन सध्या महाराष्ट्रात वाद पेटला आहे. दोन्ही बाजुंकडून यावर पुरावे देण्याची चढाओढ सुरु आहे. त्यातच होळकर घराण्याचंही नाव आलं आहे. त्यामुळं आता या वादावर होळकरांच्या वंशजांनी यासंबंधिची घराण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

- 'वाघ्या' हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा,अशी वदंता

- 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन, वाघ्याचं चितेत उडी देऊन बलिदान अशी वदंता

- समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात,समाधीला इंदूरच्या प्रिन्स तुकोजी होळकरांकडून निधी

- स्मारक ऐतिहासिक नव्हे, तर लोकश्रद्धेचे प्रतीक?

- यापूर्वीही, 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडकडून वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला

- भारतीय पुरातत्व विभागाकडे वाघ्याबाबत कोणतीही पुरावे नाहीत

तर दुसरीकडे संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देतायत त्यामुळे या वादात संभाजी ब्रिगेडनं उडी घेतलीये.. 1 मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा, असा अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला दिला आहे.

औरंगजेबाची कबर तर कधी वाघ्याची समाधी....इतिहासातील जुने मुद्दे उकरुन काढून त्याचं राजकारण केलं जातंय. आणि राज्यातल्या जनतेशी निगडीत अनेक महत्वाचे प्रश्न मात्र असेच वाऱ्यावर सोडले जातायत. यातून राज्य काय निर्णय घेणार आणि विविध संघटनांनी दिलेल्या अल्टीमेटमवर काय तोडगा काढणार हेच पाहायंचं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT