Celebrations erupt as family members of senior political leaders secure victories in the Zilla Parishad elections across Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

झेडपीत मतदारांचा घराणेशाहीला कौल, कुणी गड राखले, कुणाचे बालेकिल्ले ढासळले?

Zilla Parishad Elections: महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही मतदारांनी घराणेशाहीलाच कौल दिलाय.. तर काही ठिकाणी मतदारांनी घराणेशाही झुगारुन लावलीय.. ती नेमकी कुठं?

Bharat Mohalkar

हा जल्लोष आहे मिनी मंत्रालय मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाचा... होय... या जिल्हा परिषद निवडणुकीतही मतदारांनी पुन्हा एकदा घराणेशाहीलाच कौल दिल्याचं समोर आलंय..... राज्यातील दिग्गज मंत्री, आमदारांची मुलं, पत्नी, भाऊ यांनाच मतदारांनी भरभरुन मतदान केलं आणि विजयी गुलालही उधळलाय...

झेडपीत मतदारांचा घराणेशाहीला कौल

भास्कर जाधव (आमदार, ठाकरेसेना) (मुलगा)- विक्रांत जाधव (रत्नागिरी) (ठाकरेसेना)

दिलीप वळसे पाटील (आमदार, राष्ट्रवादी (AP) - विवेक वळसे पाटील (पुतण्या) (पुणे) (राष्ट्रवादी (AP)

सदाभाऊ खोत (आमदार, भाजप) - मोहिनी खोत (सून) (सांगली) (रयत क्रांती संघटना)

राणा जगजितसिंह पाटील (आमदार, भाजप) - अर्चना पाटील (पत्नी) (धाराशिव) (भाजप)

राम सातपुते (माजी आमदार, भाजप)- संस्कृती सातपुते (पत्नी) (सोलापूर) (भाजप)

महेंद्र दळवी, आमदार, शिंदेसेना- मानसी दळवी, (पत्नी) (रायगड) (शिंदेसेना)

आदिती दळवी, सून (शिंदेसेना)

भरत गोगावले, रोहियो मंत्री - विकास गोगावले (पुत्र) (रायगड) (शिंदेसेना)

प्रकाश आबिटकर (आरोग्य मंत्री) - रोहिणी आबिटकर (वहिनी) (कोल्हापूर) (शाहू महाआघाडी)

सचिन कल्याणशेटी(आमदार, भाजप) - शांभवी कल्याणशेट्टी (पत्नी) (भाजप)

बाबासाहेब पाटील( सहकार मंत्री ) - सुरज पाटील, मुलगा (लातूर) (राष्ट्रवादी (AP) (पं. स)

अब्दुल सत्तार, (आमदार, शिंदेसेना)- अमीर सत्तार, (मुलगा) (शिंदेसेना) (छ. संभाजीनगर)

दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात भाजपनं सर्वाधिक 44 जागा जिंकल्या.. मात्र सोलापूरमध्ये विजयाचे शिल्पकार ठरलेल्या पालकमंत्री जयकुमार गोरेंना होमपिचवर मोठा झटका बसलाय..गोरेंसह राज्यातल्या काही नेत्यांची घराणेशाही मतदारांनी झुगारून लावलीय.

उत्तम जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांचा पराभव

जयकुमार गोरे यांचा भाऊ अरुण गोरे कुकुडवाड गटातून पराभूत

भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर,

मुलगी सोनल वरपूडकर, सून प्रेरणा वरपूडकर यांचा पराभव

खरंतर घराणेशाही ही कुठल्या एका पक्षापुरती मर्यादित राहिली नाही.... सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीने हातपाय पसरल्याचं चित्र आहे... या घराणेशाहीला आधी राजमान्यता आणि आता लोकमान्यताही मिळालीय... या घराणेशाहीमुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सतरंज्याचं उचलाव्या लागणार असल्याचं दिसतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Exercise: सकाळी उठल्यानंतर करा ही 5 योगासने, ताण आणि चिंता होईल दूर

देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी! अजितदादा परतणार? अजितदादांना पवारांनी लपवून ठेवलंय?

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates: सांगलीतील पंचायत समितीवर ठाकरे सेना वगळता सर्वच पक्षांचे वर्चस्व

Government Jobs: खूशखबर! राज्यात ७० हजार पदांची होणार नोकर भरती; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Tuesday Horoscope: आयुष्यात बदल स्वीकारा फायदा होईल; ५ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT