Birthday Cake, Latur, Police, Youth saam tv
महाराष्ट्र

Police : अरं Birthday आहे भावाचा अन्..., सात युवकांवर गुन्हा दाखल, पाच ताब्यात

काही तरुण तलवारी बाळगून असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना खबऱ्याने दिली.

दीपक क्षीरसागर

Latur Crime News : तलवारीने केक (Cake) कापून रस्त्यावर (road) वाढदिवसाचा (birthday) जल्लोष करणे सात जणांना महागात पडले आहे. लातुरातील (latur) विवेकानंद चौक पोलिसांनी (vivekanad chowk police) कायद्यासह दंडुका दाखवित सात युवकांवर (youth) गुन्हा दाखल केला. या घटनेतील 'बर्थ डे बॉयसह पाच जणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रस्त्यावर सेलिब्रेशन करण्याची एक विचित्र पद्धत रुढ होत आहे. परंतु, रस्ता अडविणे, रहदारीला अडथळा करणे, येणाऱ्या-जाणाऱ्यास त्रास होईल असे वर्तन करणे हा गुन्हा ठरताे. पोलिस अशा महाभागांना चांगलाच धडा शिकवित आहेत. विवेकानंद चौक ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी तरुणांनी (youth) एकत्र येत बर्थ डे सेलिब्रेशन केले. त्यावेळी तलवारीने केक कापण्यात आला. काही तरुण तलवारी बाळगून असल्याची माहिती (latur) पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांना खबऱ्याने दिली.

त्यावरून जव्वाद अजमद देशमुख, वशीम खलील शेख, महेताब माजीद शेख, अफताफ उर्फ अरबाज शेरखान पठाण, अबरार अरशद देशमुख, अतुल्ला अस्लम देशमुख आणि साहिल सिकंदर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अतुल्ला देशमुख आणि साहिल शेख यांचा पाेलिस शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT