Pandharpur, vitthal rukmini marriage saam tv
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Wedding Ceremony : विठ्ठल-रुक्मिणीचा उद्या शाही विवाह सोहळा; बंगळूरहून आला पाेषाख

प्रजासत्ताक दिना निमित्त उद्या पंढरपूरात भाविकांची गर्दी हाेण्याची शक्यता आहे.

भारत नागणे

Pandharpur News : वसंत पंचमी निमित्त (Vasant Panchami) उद्या दुपारी बारा वाजता पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचा (Vitthal Rukmini Wedding Ceremony) विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या निमित्त पंढरपूरात (pandharpur) जय्यत तयारी सुरु आहे. (Maharashtra News)

या शाही विवाह सोहळ्यासाठी लागणारे विठुरायाचे आणि रूक्मिणी मातेचे रेश्मी पोषाख मंदिर समितीकडे आले आहेत. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर समिती उद्या विठुरायाला पांढ-या रंगाचे रेश्मी पोषाख आणि रूक्मिणी मातेला पांढ-या रंगाची रेश्मा साडी परिधान करणार आहे.

बंगळूर येथील एका भाविकाने विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोषाख भेट दिला आहे. हा पाेषाख उद्या देवतांना परिधान करण्यात येणार आहे. उद्या प्रजासत्ताक दिन असल्याने नागरिकांना सुटी आहे. त्यामुळे या विवाह साेहळ्यासाठी भाविकांची माेठी गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

Job Fraud : आरोग्य विभागात घोटाळा! एकच व्यक्ती, ६ जिल्ह्यात नोकरीला, सरकारला लावला कोट्यवधीचा चुना

Sambhajinagar : सिल्लोड तालुक्यात ढगफुटी सदृश्य , घाटनांद्रा परिसराचा संपर्क तुटला | पाहा VIDEO

Risod Police : फसवणूक करत वर्षभरापासून फरार; रिसोड पोलिसांनी घेतले ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Somvar Upay: सोमवारच्या दिवशी शंकराचे करा 'हे' उपाय; देवी लक्ष्मी स्वतः येईल घरी

SCROLL FOR NEXT