Virendra Tawde Saam TV
महाराष्ट्र

गोविंद पानसरें यांच्या हत्येच्या कटामागील मुख्‍य सुत्रधार वीरेंद्र तावडेच?

डॉ.वीरेंद्र तावडे आणि सचिन आंदुरे यांच्यावरील दोषारोप निश्‍चित करण्याचे काम सद्या न्यायालयात सुरू आहे.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्येच्या कटामागील मुख्‍य सुत्रधार हा वीरेंद्र तावडे (Virendra Tawde) होता. या संदर्भातील काही पुरावे आज विशेष सरकारी वकील हर्षवर्धन निंबाळकर यांनी कोल्हापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर सादर केले आहेत.

या आधीच्या सुनावणीत हत्येतील पहिला आरोपी समीर गायकवाड याचा दोषमुक्तीचा अर्ज संशयित आरोपींच्या वकीलांनी मागे घेतला होता. त्यानंतर डॉ. वीरेंद्र तावडे आणि सचिन आंदुरे यांच्यावरील दोषारोप निश्‍चित करण्याचे काम सद्या कोल्हापूर न्यायालयात सुरू आहे.

पहा व्हिडीओ -

यावर आज सरकारी बाजू मांडण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT