Virar News Saam tv
महाराष्ट्र

Virar News: विरारमध्ये निर्माणाधीन इमारातीची भिंत कोसळली; ३ महिला कामगारांचा मृत्यू

Virar News: विरारमध्ये निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली.

चेतन इंगळे

Virar News: विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विरारमध्ये निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळून चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आता तीन महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या पूर्व भागातील सूर्य किरण या निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याची घटना घडली. इमारतीची प्रमुख भिंत कोसळली. ही भिंत कोसळल्याने यात ४ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. हे कामगार या भिंतीखाली काम करत होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या कामगारांनी तातडीने अडकलेल्या कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यानंतर या कामगारांना रुग्णालयात दाखल केले.

भिंत कोसळल्याने कामगारांची प्रकृती चिंताजनक सांगण्यात येत होती. या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपाचारादरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेने मृत कामगारांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पंढरपूरमध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Contrast Blouse: साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडायचा?

हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप का दिली जाते?

Silver Price Today: चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, २०००० रुपयांनी झाली स्वस्त; वाचा आजचे दर किती?

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री, शासन निर्णय जारी

SCROLL FOR NEXT