Virar Accident News Saam tv
महाराष्ट्र

Virar Accident News: ट्रकखाली ३ जण चिरडले; एकाचा जागीच मृत्यू, पती–पत्‍नी गंभीर जखमी

ट्रकखाली तीन जण चिरडले; एकाच जागीच मृत्यू, पती– पत्‍नी गंभीर जखमी

चेतन इंगळे

विरार : विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील नारंगी फाटक रस्त्यावर एक हायवा ट्रक रस्त्यातच उलटल्याने भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रकखाली तीन जण सापडल्याची माहिती समोर येत (Virar) असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Maharashtra News)

विरार नारिंगी फाटकापासून ग्लोबल सिटीच्या दिशेने हा ट्रक जातं होता. मात्र भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टेम्पोला वाचविण्याच्या नादात ट्रकचा टायर खड्ड्यात गेला. यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याकडेला उलटला. याच दरम्यान समांतर दिशेने जाणारे दुचाकीवरील तिघे जण ट्रकखाली सापडल्याने चिरडले गेले.

पती– पत्‍नी गंभीर

घटनेची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक व अग्निशमन पथकाच्या जवानांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु केले आहे. हा ट्रक मालाने भरलेला असल्याने तीन क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT