ratnagiri , Uday Samant Saam Tv
महाराष्ट्र

Rajapur : आंदाेलक भडकला, 'भ... उदय सामंतला जाळून टाकू' (व्हिडीओ पाहा)

आता याबाबत अधिक चौकशी केली जाईल असे पाेलिसांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश काेळी

Uday Samant News : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना जाळून टाकू असे वक्तव्य एका आंदाेलकाने केल्याने रत्नागिरी जिल्ह्यात (ratnagiri) महाराष्ट्रात मंत्री सामंत यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रिफायनरीस विराेध करा परंतु असे प्रक्षाेभक भाषण करुन चिथावणी देण्याचे प्रकार घडू नयेत याची काळजी पाेलिसांनी (police) घ्यावी असे समर्थकांचे म्हणणे आहे. (Ratnagiri Latest Marathi News)

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काल झालेल्या राजापूर दौऱ्याच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. रिफायनरी विरोधक जोशी नामक नेत्याने नाना पटोले व पोलिसांच्या उपस्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. या जोशी नामक नेत्याचा व्हिडओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असून पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

आता या प्रकरणात कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी देखील लक्ष घातले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मंत्री सामंत यांच्यासमवेत चर्चा केली. आता याबाबत अधिक चौकशी केली जाईल असे पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT