A shocking viral video allegedly shows a fish vendor spraying cockroach killer on fish in Vasai, raising serious food safety concerns. Saam Tv
महाराष्ट्र

तुमच्या माशांवर केमिकल स्प्रे? तुम्ही खाताय केमिकल मासे?

Viral Video Raises Alarm: माशांवर केमिकल फवारणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हा धक्कादायक प्रकार कुठे घडलाय?...पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Saam Tv

सावधान... तुम्ही जर रस्त्यावर मासे विकत घेत असाल तर सावधान... कारण तुम्ही मासे नाही तर माश्यांच्या नावाखाली केमिकल खाताय..हो तुम्ही चक्क केमिकल खाताय..असं आम्ही का म्हणतोय...तर मग हा व्हीडीओ नीट पाहा..होय हे आहे झुरळ मारण्याचं केमिकल.. हेच केमिकल वसई पूर्व येथील नवजीवन परिसरातील एका मासेविक्रेत्याकडून माशांवर मारलं जातंय.. आणि तुमच्या जीवाशी खेळ केला जातोय..

खरंतर, हे औषध झुरळ मारण्यासाठी उपयोगात आणलं जातं आणि त्यामुळे ते विषारी असतं. तसंच, हे केवळ कीटक मारण्यासाठी बनवलेले आहे. त्याचा अन्नाशी किंवा खाद्यपदार्थांशी थोडा जरी संपर्क आला, तरी ते आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतं. मात्र हा प्रकार काही पहिलाच नाहीये.. याआधीदेखील मासे विक्रेत्यांकडून अनेकदा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचं निदर्शनास आलंय. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात मासेविक्रेत्याकडून मासे विकताना लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तसंच, कुठे मासे ताजे दिसावेत म्हणून रंगदेखील लावला जातोय. तर कुठे सांडपाण्यात मासे धुतले जाताहेत. तर काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये एका फळविक्रेत्यानं उंदीरांनी फळ खाऊ नये म्हणून उंदीर मारण्याचं औषध लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता...अशातच आता माशांवर स्प्रे मारतानाचे दृश्य समोर आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

अशा धोकादायक प्रकारामुळे सर्वसामान्यांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय. वेळोवेळी कारवाई होऊनही ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरूच असतो. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर कठोरात कठोर कारवाई कधी होणार, हाच खरा प्रश्न.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT