Eknath Shinde News, Vinod Patil News, Maratha Reservation News Updates Saam Digital News
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे विजयी व्हावेत आणि मराठा आरक्षणाचा तोडगा काढावा : विनोद पाटील

विनोद पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष आता नवीन वळणावर येऊन ठेपला आहे. शिवसेनेने (Shivsena) शिंदे गटातील 16 बंडखोर आमदारांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी केली आहे असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे शिंदे (Eknath Shinde) गटाने याविरोधात आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. अशातच मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. (Vinod Patil Facebook Post On Eknath Shinde)

इतकंच नाही तर, विनोद पाटील यांनी "ज्या तळमळीने खुर्चीसाठी झटता त्याच्या अर्ध तरी मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कष्ट कराल का? यामध्ये एक मराठा लाख मराठा असणारे एकनाथ शिंदे साहेब विजयी झाले तर आनंदच आहे. साहेब तुम्ही विजयी व्हावेत व मराठा आरक्षणाचा तोडगा आपण काढावा यासाठी शुभेच्छा" असं म्हणत एकनाथ शिंदे यांना विजयासाठीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.(Maratha Reservation News Updates)

विनोद पाटील यांची फेसबुक पोस्ट

न्यायालयातून सरकार आलं, न्यायालयातून सरकार जाईल.. परंतु न्यायालयात प्रलंबित मराठा आरक्षणाच काय..?

देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार यांनी पहाटेचा शपथविधी करून सरकार स्थापन केले. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा हस्तक्षेप केला व खुले मतदान घेण्याचा आदेश दिला. परिणामी तीन दिवसात सरकार कोसळलं.. आणि न्यायालयाच्या आदेशाचा फायदा महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी झाला.

आजही तसच होताना दिसतंय..

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाला बजावण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि अजय चौधरी साहेब यांच्या गटनेते नियुक्तीलाही आव्हान देण्यात आलं आहे.

शिंदे यांचा दावा आहे की, उपाध्यक्ष (हंगामी अध्यक्ष) मला अपात्रतेची नोटीस देऊ शकत नाहीत. कारण मी गटनेता आहे, अजय चौधरी यांची निवड अयोग्य असून बहुमत आमच्याकडे आहे.

यावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. शिंदे यांच्या बाजूने जेष्ठ विधीतज्ञ हरीश साळवे साहेब तर शिवसेनेच्या वतीने अभिषेक सिंघवी साहेब हे बाजू मांडणार आहेत.

शिंदे यांच्या नावावर गटनेते पदाबाबत शिक्कामोर्तब झालं तर व्हीप काढण्याचा अधिकार त्यांचा असेल. साहजिकच ते महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात असतील. परिणामी न्यायालयातून आलेलं सरकार न्यायलायातून जाईल..अस दिसतय.

पक्ष कुठलाही असो, सरकार व आपली खुर्ची वाचवण्यासाठी व मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. प्राणपणाने कोर्टात सुद्धा लढा देतात.

मात्र हे करत असताना त्या अगोदर निवडून येण्यासाठी ज्यांची तुम्हाला मदत होते, त्या बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला विसरून जाता.

ज्या तळमळीने खुर्चीसाठी झटता त्याच्या अर्ध तरी मराठा आरक्षणासाठी न्यायालयात कष्ट कराल का?

यामध्ये एक मराठा लाख मराठा असणारे एकनाथ शिंदे साहेब विजयी झाले तर आनंदच आहे. साहेब तुम्ही विजयी व्हावेत व मराठा आरक्षणाचा तोडगा आपण काढावा यासाठी शुभेच्छा..

- विनोद पाटील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT