narayan rane vinayak raut 
महाराष्ट्र

राणेंना जावई शोध लावायची सवय, दहा पिढ्या जातील : विनायक राऊत

खासदार विनायक राऊत हे सिंधूदुर्गात आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग (kokan news) : खासदार सुप्रिया सुळे यांचे नातेवाईक संन्यासी होते का? अस विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी नुकतेच केले होते. खासदार सुप्रिया सुळे यांचे नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती असेही राणेंनी नमूद केले हाेते. त्यास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे (supriya sule), अजित पवार (ajit pawar), प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांच्यावर होत असलेली कारवाई ही सुडबुद्धीने केली जात आहे. पूर्वग्रह दुषित ठेऊन कारवाई केली जात आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे हा सतेचा दूराेपयोग केला जात असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

खासदार विनायक राऊत हे सिंधूदुर्गात आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले राज्य सरकारला निवडणुका नको आहेत आणि हे पुढे ढकलण्याचे काम छगन भुजबळांना दिलं गेलं आहे असे राणेंनी म्हटलं हाेते. खरंतर नारायण राणे यांना जावई शोध लावायची सवय आहे असा टाेला राऊतांनी लगावला. राज्य सरकारने ओबीसींना आरक्षण द्यायचा अद्यादेश काढला. केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा न दिल्याने सुप्रीम कोर्टात स्थगिती दिली गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंपेरिकल डाटा जमा करण्याच्या मागे लागलेला आहे.

आशिष शेलारांच्या संस्कृतीत बसते का ?

आशिष शेलारसारख्या जबाबदार माणसाला शोभत का त्याचा आधी त्यांनी विचार करावा. महिला महापौर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य योग्य नाही. शिवसेनेला नको त्या मार्गाने चालायचं नाहीये. महिला महापौरांबाबत असे बोलणे आशिष शेलार यांच्या कोणत्या संस्कृतीत बसत आहे असा सवाल राऊतांनी केला आहे.

तुमच्या दहा पिढ्या जातील

संजय राऊत यांच्याबद्धल नितेश राणे यांनी जिभेच संशोधन केले पाहिजे या वक्तव्याचा विनायक राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणले त्याच्या जिभेचं संशोधन करायला तुमच्या दहा पिढ्या जातील परंतू तुम्हला तिथंपर्यत जाण शक्य हाेणार नाही.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT