Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

काका-पुतण्याचा फॅमिली ड्रामा; विनायक मेटेंचा क्षीरसागर यांच्यावर घणाघात

बीडमध्ये सुरु असलेल्या क्षीरसागर काका- पुतण्याच्या वादावर, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी टीकास्त्र सोडले

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये सुरु असलेल्या क्षीरसागर काका- पुतण्याच्या वादावर, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी टीकास्त्र सोडले आहे. बीडकरांनी (Beed) काही दिवसांपूर्वी नौटंकी पहिली होती. यात अनेक पात्र देखील पाहिले, क्षीरसागर (Kshirsagar) काका- पुतणे हे आतून एकच असल्याचं म्हणत, बीडमध्ये फॅमिली ड्रामा सुरू असल्याच विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी यावेळी म्हटले आहे.

हे देखील पहा-

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून अशी गत सध्या बीडमध्ये सुरू आहे. नुकतेच आमदार संदीप क्षीरसागरांना (Sandeep Kshirsagar) सोडून शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केलेले पाच पांडव असतील तर यांचा कौरव कोण? असा सवाल देखील मेटेंनी उपस्थित केला आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या शिवसेना पक्षप्रवेशावर देखील सडकून टीका केली आहे. तर येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीसाठी (election) आम्ही सर्व ताकतीने मैदानात उतरणार असून नव्या चेहऱ्यांना निवडणुकीसाठी संधी देणार असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT