Modi Awas Gharkul Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Shinde Government : विमुक्त जाती व भटक्या जमातींना मिळणार मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ

Modi Awas Gharkul Yojana : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणेच मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मृद व जलसंधारण मंत्री राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nomadic Tribes Get Modi Awas Gharkul Yojana Benefits:

राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश ‘मोदी आवास’घरकुल योजनेमध्ये करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.(Latest News)

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना इतर मागास प्रवर्गाप्रमाणेच मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी मृद व जलसंधारण मंत्री राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

यापूर्वी २८ जुलै २०२३ रोजी जारी करण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयातील नमूद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अशी अट या नव्या शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.

शासन निर्णयामुळे आता राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार होईल. या महत्त्वाकांक्षी निर्णयाबद्दल मंत्री राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT