sangli, bison, shigoan, villagers saam tv
महाराष्ट्र

जिल्हा परिषद शाळेनजीकच्या शेतात घुसला गवा; ग्रामस्थ चिंतेत

काही दिवसांपूर्वी वडगाव (ता. हातकणंगले) येथे गवा दिसला होता.

विजय पाटील

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथे फारणेवाडी रस्त्याच्या सुरुवातीस आज (रविवार) सकाळी ग्रामस्थांना गवा (bison) दिसला. यामुळे परिसरातील शेतकरी (farmers) आणि शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. (sangli bison latest marathi news)

शिगावात गवा दिसल्याने ग्रामस्थांत घबराहट पसल्याची माहिती गावाचे लोकनियुक्त सरपंच उत्तम गावडे व त्यांचे सहकारी यांनी पोलीस प्रशासन, वन विभाग यांना कळवली आहे. शिगाव गावात गवा काेठून आला असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी वडगाव (ता. हातकणंगले) येथे गवा दिसला होता.

त्यानंतर वडगाव परिसरात गव्याचा चक्क कळपच दिसला होता. कदाचित त्यातीलच एक गवा नदी ओलांडून किंवा पुलावरून पहाटे शिगाव गावात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या गवा शिगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील ऊसाच्या शेतात बसला आहे अशी माहिती मिळाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT