padali sasan kathi, jotiba yatra saam tv
महाराष्ट्र

Jyotiba Dongar : जाेतिबाच्या नावानं चांगभलं... पाडळीतील मानाच्या सासनकाठीला केंद्राचे कॉपीराइट नामांकन

padali sasan kathi : यावेळी भाविक माेठ्या संख्येने उपस्थितीत हाेते.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेत पहिल्या क्रमांकाचा मान असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पाडळी इथल्या मानाच्या सासनकाठीला केंद्र शासनाचे कॉपीराईट नामांकन प्राप्त झाले. त्या कॉपीराईटचा नुकताच जोतिबा देवाच्या मुख्य मंदिरात प्रकाशन सोहळा झाला. (Maharashtra News)

या कार्यक्रमास काेडाेली पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक शीतलकुमार डाेईज व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जाेतिबा येथील अधीक्षक धैर्यशील तिवले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित हाेते. या सासनकाठीची कोणी कॉपी करू नये म्हणून हे कॉपीराइट नामांकन पाडळी गावच्या ग्रामस्थांनी मिळवल्याचे नमूद केले. यावेळी जोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करण्यात आला.

ज्याेतिर्लिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र ढाेणे म्हणाले आमच्या पाडळी गावच्या मानाच्या सासनकाठीला केंद्र शासनाने काॅपी राईट नामांकन मिळाले आहे. जाेतिबा डाेंगरावर मुख्य मंदिरात आम्ही विधिवत पूजा करुन त्याचा प्रकाशन साेहळा साजरा केला. आमच्या सासनकाठीची काेणी काॅपी करुन नये म्हणून आम्ही नामांकन मिळविले आहे. यावेळी भाविक माेठ्या संख्येने उपस्थितीत हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT