बीड मध्ये रेशन दुकानातील काळाबाजारा विरोधात गावकरी आक्रमक; तलावात केलं जलसमाधी आंदोलन! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीड मध्ये रेशन दुकानातील काळाबाजारा विरोधात गावकरी आक्रमक; तलावात केलं जलसमाधी आंदोलन!

पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी आणि पोलिसां विरोधात तीव्र घोषणाबाजी

विनोद जिरे

बीड : सहा महिन्यांपासून रेशन Ration मिळत नसल्याने, संतप्त गावकऱ्यांनी थेट तलावातच lake जलसमाधी आंदोलन Jalsamadhi करत जिल्हाप्रशासन District Administration व पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी केली आहे. बीड तालुक्यातील खडकी आणि तांदळवाडी घाट येथील रेशन दुकानदार, काळ्या बाजारात Black Market रेशन विकताना रंगेहाथ पकडून दिल्यानंतरही, त्या रेशन दुकानावर कारवाई होत नसल्याने, संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तलावात जलसमाधी आंदोलन केलं. (Villagers aggressive against black market of rations)

यावेळी अनेक गावकरी तलावात उतरले होते. तर पालकमंत्री धनंजय मुंडे, Dhananjay Mundhe स्थानिक आमदार संदीप क्षिरसागर MLA Sandeep Kshirsagar, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी देत लवकरात लवकर कारवाई करा.अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू. असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

गावातील नागरिकांनी गेल्या 10 दिवसापूर्वी काळ्याबाजारात रेशनचा माल विक्री करत असताना, रेशन दुकानदाराला रंगेहात पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्याविरोधात कसलीच कारवाई केली नाही. तर महसूल विभागाने पंचनामा करून काहीच केलं नाही उलट दुकानदाराला पाठीशी घातलं. असा आरोप बाळासाहेब मोरे यांनी केला. दरम्यान रेशनचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून गोरगरिबांना हक्काचं धान्य मिळवून द्यावं. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT