VILAS GHULE DEATH CASE ESCALATES; FAMILY DEMANDS ARREST OF MP'S SON, BEGINS INDEFINITE HUNGER STRIKE 
महाराष्ट्र

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

Vilas Ghule Death Case: खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या अटकेची मागणी करत मृताच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बीडमधील विलास घुले मृत्यू प्रकरण अधिकच चिघळले आहे. या प्रकरणाकडे पोलीस तपास आणि जनसामान्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

Bharat Jadhav

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीडमध्ये विलास घुले खून प्रकरण तापलंय. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यावर घुले कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. सौरव सोनवणेच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. माझ्या मुलाला न्याय द्या, सौरभ बजरंग सोनवणे याला अटक करा, अन्यथा आम्ही इथंच आत्महत्या करू, असा टोकाचा इशारा मयत विलास घुलेच्या आईसह भावाने दिलाय. तर घुलेच्या टाकळी गावच्या सरपंचाने देखील आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत घुले कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाहीत, असा पवित्रा घेतलाय.

मुख्यमंत्र्यांनी एकाला एक न्याय आणि दुसऱ्या एक न्याय, असं करू नये, लहान जात असली म्हणून न्याय मिळणार नाही का? असा देखील सवाल त्यांनी केलाय. माझा मुलगा जाऊन ४० दिवस झाले, मात्र अद्याप न्याय मिळाला नाही. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली नाही. आम्ही न्याय मिळावा म्हणून मुंबईत निवेदन देण्यासाठी ६ दिवस थांबलो.

मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. तुम्ही दुसऱ्या १०० जणांना अटक केली तरी काय उपयोग, तुम्ही मुख्य आरोपीला आणखी आम्हाला मारायला बाहेर ठेवलय का? असा सवाल मयत विलास घुलेच्या आईने केलाय. जर आरोपीला अटक झाली नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व कुटुंब आत्महत्या करू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

माझा भाऊ जखमी असताना त्याने सौरव सोनवणे याचे नाव घेतले आहे. त्यानेच हे करायला सांगितलं असे विलास घुलेच्या भावाने सांगितलंय. जे साक्षीदार आहेत त्यांनी देखील आपल्या जबाबात नाव दिली आहेत. मग पोलीस का कारवाई करत नाहीत. यांना आम्ही मेल्यावर जग येणार का? असा संतप्त सवाल देखील यावेळी रमेश घुले यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT