विक्रम गोखलेंचे कंगनाला समर्थन; म्हणाले, स्वातंत्र्य भिकेनेच मिळाले आहे! SaamTvNews
महाराष्ट्र

विक्रम गोखलेंचे कंगनाला समर्थन; म्हणाले, स्वातंत्र्य भिकेनेच मिळाले आहे!

कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही ते भिकेनेच मिळाले आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त (Vikram Gokhale) ब्राह्मण महासंघाच्या (Bramhan mahasangh) वतीने पुण्यात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात त्यांनी अनेक राजकीय विषयांवर आपली मते मांडली. भाजप-शिवसेना युती व्हावी याबाबत मी पुढाकार घेतलाय आणि घेईन असं ते म्हणाले. विशेष म्हणजे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा "चूक झाली" असं उत्तर फडणवीसांनी दिलं असा गौप्यस्फोट गोखले यांनी केला आहे.

याशिवाय मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुण्यातील दुधाणे लॉन्स परिसरात हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राम्हण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्राम्हणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? ब्राम्हण,कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे, त्यापूर्वी कोणी नव्हते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ने १९४७ साली मिळालेले भारतीय स्वातंत्र्य हे भीक होते, २०१४ मध्ये देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून देशात गदारोळ माजलेला असतानाच आता अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे समर्थन केल्याने वादात भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विक्रम गोखले म्हणाले की, "कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही ते भिकेनेच मिळाले आहे, आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले" असा गंभीर आरोप ही त्यांनी केलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT