Nashik, youth, police, vikas nalawade saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : मामा, दाजींची मदतीने बहिणीशी लग्नाचा तगादा लावणा-या युवकाचा भावाने काढला काटा

पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- तबरेज शेख

Nashik : एकतर्फी प्रेमातून (love) बहिणी मागे लग्नाचा (marriage) तगादा लावणाऱ्या तरुणाची (youth) मुलीच्या भावाने हत्या केल्याची घटना नाशिक (nashik) जिल्ह्यात घडली आहे. ही घटना आडगाव परिसरात बुधवारी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. दाेघा संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून तिसरा रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार मयत विकास रमेश नलावडे निलगिरी बाग परिसरात राहत होता. विकासचे ताे राहत असलेल्या परिसरातील एका तरुणीवर प्रेम होते. त्याला तरुणीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे विकासने तरुणीकडे सतत लग्नासाठी तगादा लावला होता.

तरुणीच्या भावाला हे समजले. त्याला या गोष्टीचा राग आल्याने त्याने बुधवारी (ता. 22 फेब्रुवारी) रात्री 10.30 वाजेच्या सुमारास निलगिरी बाग परिसरातील बिल्डिंग नंबर 5 समोर असलेल्या मोकळ्या जागेत "तू माझ्या बहिणीशी लग्न करायचे असे का बोलतो" या कारणावरून कुरापत काढून विकास रमेश नलावडे यास संशयितांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर तरुणीच्या भावाने दाेन साथीदारांसह धारदार शस्त्राने विकास याच्या पोटात आणि डोक्यात जबर वार करून त्यास गंभीर जखमी (injured) करून ठार मारले. (Maharashtra News)

या गुन्हामध्ये गुन्हे शोध पथक यांनी मुख्य संशयितास ताब्यात घेतले. त्यास त्याच्या इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्यासोबत त्याचा मामा व दाजी यांची नावे सांगितले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेतील तिसरा संशयित हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT