Vijay Wadettiwar SaamTV
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: लॉकडाऊनबाबत विचार नाही, नियम अधिक कडक करावे लागतील - विजय वडेट्टीवार

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं नियम अधिक कडक करावे लागतील.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं नियम अधिक कडक करावे लागतील. मात्र लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊनबाबत सध्यातरी विचार नाही, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेतील असंही ते म्हणाले (Vijay Wadettiwar says there is no lockdown for now but rules have to be tightened).

नियम अधिक कडक करावे लागतील - वडेट्टीवार

"कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं नियम अधिक कडक करावे लागतील. मात्र लॉकडाऊन (Lockdown) किंवा मिनी लॉकडाऊनबाबत सध्यातरी विचार नाही. नियम कडक करण्यासंदर्भात टास्क फोर्ससोबत चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय घेतील", असं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

संक्रांतीनंतर लाट कमी होईल अशी शक्यता - वडेट्टीवार

"लोकांनी काळजी घ्यावी, ही लाट लवकर कमी होण्याचीही शक्यता आहे. संक्रांतीनंतर ही लाट कमी होईल अशी शक्यता आहे. तसेच, लोकलबाबत सध्या निर्णय नाही, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील". असंही ते म्हणाले. रात्री नाईट कर्फ्यूची आवश्यक आहे. जेणेकरुन समूहसंसर्ग टाळता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

मेडिकल प्रवेशासाठी ओबीसी विद्यार्थ्यांचं आरक्षण कायम - वडेट्टीवार

"ओबीसी विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश कोट्यात 27 टक्के आरक्षण कायम ठेवले आहे, हा निर्णय ऐतिहासिक आहे. सात वर्षे ओबीसी पंतप्रधान असूनही ओबीसींना न्याय मिळत नसेल तर काय फायदा आहे. त्यामुळं हा निर्णय न्यायालयाने दिला त्याचं आम्हाला समाधान आहे", असं ते ओबीसी आरक्षणावरुन म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT