Vijay Wadettiwar on Mahayuti Sarkar Saam Tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Vijay Wadettiwar on Mahayuti Sarkar: राज्यपाल अभिभाषणावर बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केलीय. तसंच एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत २८ टक्के वाढ झालीय, सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. सामान्यांवर महागाईची टांगती तलवार असल्याचंही ते म्हणाले.

Bhagyashree Kamble

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा महायुतीने जाहीरनाम्यात केली होती, अजूनही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार हे सांगितलेलं नाही. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलांना २१०० रुपये देणार असे आश्वासन दिले, पण अजूनही अंमलबजावणी बाबत चित्र स्पष्ट नाही. असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला केला आहे.

राज्यपाल अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत. पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते फोल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्न आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत २८ टक्के वाढ झालीय, सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. लोकांवर महागाईची टांगती तलवार असल्याचंही ते म्हणाले.

राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेचा आज शेवटचा दिवस होता, यावेळी चर्चेत सहभागी असताना विजय वडेट्टीवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप केला. राज्यपाल यांनी एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार असं म्हणाले, पण महाराष्ट्रावर ९ लाख कोटींचे कर्ज आहे. दुसरीकडे राज्यातील महिला तरुणी गायब आहेत याचा उल्लेख मात्र राज्यपालांच्या भाषणात नव्हता. असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

लाडकी बहि‍णीचे पैसे बँकेने कर्जासाठी वळवल्याचे उदाहरण समोर आले आहे. अमरावतीमधील निर्मला चारपे यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, ते बँकेकडून परस्पर कर्जासाठी वळवण्यात आले. सरकारने मग जे नियम लावले, जीआर काढले त्याला काय अर्थ आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

SCROLL FOR NEXT