पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार 10 हजार रुपये; वडेट्टीवारांची माहिती Saam Tv
महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार 10 हजार रुपये; वडेट्टीवारांची माहिती

उद्यापासून ही रक्कम नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नागपूर: कोकण Kokan आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात मुसळधार पावसाने Rain मोठ्या प्रमाणात नुकसान Damage झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांनी जोर लावून धरली होती. आता सरकारने नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. सरकारने Government नुकसानग्रस्तांना १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्यापासून ही रक्कम नुकसानग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

उद्यापासून पूरग्रस्तांना मदत म्हणून १० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. रोख रकमेचे वाटप केले तर पैशाचे वाटप बरोबर झाले नाही, यात गैरप्रकार झाले असे अनेक आरोप करण्यात येतात. आता त्या भानगडीत आम्हाला पडायचे नाही त्यामुळे थेट खात्यात पैसे दिले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

शासनाला तातडीने पंचनामे करून ८ दिवसात अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. मुसळधार पावसामुळे चार लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावेळी वड्डेटीवार यांनी केंद्राकडून मिळालेल्या मदतीवरही भाष्य केले आहे. केंद्र सरकारने ७०० कोटी रुपये दिले, पण ते गेल्यावर्षी आलेल्या ऑक्टोबरच्या पुराचे असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकांमध्ये असे गैरसमज आहेत की, बघा पूर आला आणि पैसे दिले. आम्ही ३७२१ कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. आता त्यातले ७०० कोटी मिळाले. निसर्ग वादळ, तौक्ते आणि विदर्भातील महापूर त्याची मदत अद्याप देखील मिळालेली नाही. या सर्व संकटात राज्याला ४२० आणि ७२१ कोटींची मदत मिळाली आहे. म्हणजे राज्याला आतापर्यंत केवळ ११४१ कोटी आतापर्यंत मिळाले आहेत. पुढचे पैसे मिळावेत ही अपेक्षा करतो असे देखील ते यावेळी म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

SCROLL FOR NEXT