आयर्न मॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; Video होतोय व्हायरल  SaamTvNews
महाराष्ट्र

Video : आयर्न मॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला; मुख्य आरोपीस अटक

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक मध्ये नाव कोरलेल्या आयर्न मॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणात मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

विरार : एशिया बुक ऑफ रेकॉर्ड (Asia Book Of Record) व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (World Book Of Record) मध्ये नाव कोरलेल्या विरार मधील आयर्न मॅन हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीस पोलिसांनी अटक केली असून राज वसंत पाटील असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी राज वसंत पाटील

संपूर्ण भारताचे व वसई विरार (Vasai-Virar) शहराचे नाव अनेक देशात गाजवणाऱ्या आयर्न मॅन हार्दिक पाटील (Iron Man Hardik Patil) यांच्या राहत्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीला विरार पोलीसांना यश आले आहे. आरोपी राज वसंत पाटील याला वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी मध्य रात्री तीन अनोळखी व्यक्तींनी आयर्न मॅन हार्दिक पाटील यांच्या विरार पश्चिम मधिल राहत्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला होता. हा सर्व प्रकार CCTV मध्ये देखील कैद झाला होता.

हल्ला कोणी केला हे अजून निष्पन्न झाले नव्हते. मात्र आज विरार (Virar) पोलिसांनी प्रमुख आरोपी राज वसंत पाटील याला अटक केली असून अजून दोन आरोपी फरार आहेत. आयर्न मॅन हार्दिक पाटील यांनी दिलेल्या तक्रारी वरून विरार पोलिसांनी CCTV च्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात सुरवात केली होती. मात्र, तब्बल एक वर्षांनंतर विरार पोलिसांना आरोपी ला पकडण्यास यश आले मात्र अजून दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

आयर्न मॅन हार्दिक पाटील यांना चार वेळा इव्हेंट इंडिया बुक,तीन वेळा एशिया बुक आफ रेकॉर्ड आणि 11 वेळा विविध बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले होते. मात्र हार्दिक पाटील यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब ने हल्ला का करण्यात आला हे अजून तरी निष्पन्न झाले नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : प्रेमाच्या भरात चुका करू नका! जोडीदारामध्ये लग्नाआधी दिसणारे ‘हे’ संकेत दुर्लक्ष करणे पडेल महागात

Pune : पुण्यात आयटी इंजिनियरनं आयुष्य संपवलं, १५ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra News Live Update: बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी

वर्षातून फक्त 3 महिनेच मिळतं हे फळ; आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

Weight Loss Drink: वजन आणि पोटावरील चरबी कमी करायची आहे? मग रोज प्या 'हे' ५ हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT