Chhatrapati Sambhaji Nagar Pimpal Purnima: उद्या म्हणजेच शनिवारी (३ जून) वटपौर्णिमेचा सण आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात. मात्र, या जन्मातच काय पुढच्या सातजन्मी सुद्धा अशी बायको नको, असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित पुरूषांनी वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे. (Breaking Marathi News)
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील वाळूज परिसरामध्ये आज पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. सात जन्मच काय सात सेकंद देखील आम्हाला ही बायको नको,असा घोषणा देत पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत त्यांनी पूजन केले.
छत्रपती संभाजीनगर २०१७ पासून पत्नी पीडित संघटना ही राज्यभरातील पत्नीपीडित पतीसाठी काम करीत आहे. यासाठी वाळूज परिसरात पत्नी पीडितांच्या निवासासाठी पत्नी पीडित आश्रम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी राज्यभरातून आतापर्यंत जवळपास नऊ हजार पत्नी पीडितांनी नोंदणी केली आहे. अनेक पीडित बायकोपासून सुटका व्हावी म्हणून न्यायालयीन लढा देत आहे. (Latest Marathi News)
मात्र, त्यांना न्याय मिळत नसून प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागत आहे. त्यासाठी पत्नी पीडित आश्रमाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. घरातून हाकलून दिलेल्या पुरुष या ठिकाणी राहतात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाचे पूजन करून कुटुंबाची आणि पतीच्या आरोग्यासाठी देवाकडे साकडे घालतात.
मात्र, हे जर खरे असेल तर वडाच्या ऐवजी पिंपळाची पूजा करून बायको पासून सुटका मिळावी म्हणून विनवणी करण्यासाठी हे पूजन करण्यात येत आहे. पिंपळ हे लग्न न झालेला व्यक्तीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे पिंपळाची १०८ उलट्या प्रदक्षिणा घालत पूजा करून बायको पासून सुटका व्हावी अशी विनंवणी पत्नी पीडित पुरूषांनी केली आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.