Vasai- Bhayander News Saam tv
महाराष्ट्र

Vasai- Bhayander News : वसई ते भाईंदर समुद्रात रो रो सेवेला सुरुवात; नागरिकांचा वाचणार वेळ

Vasai News : सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालविली जाणाऱ्या या जान्हवी या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवाशी इतकी असणार आहे.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

वसई : वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील अंतर कमी करणारी रो रो सेवेला (vasai) आजपासून प्रायोगिक तत्वावर सुरवात करण्यात आली आहे. या सेवेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. (Live Marathi News)

महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीत वसई-भाईंदरदरम्यान (Bhayander) प्रायोगिक तत्त्वावर रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा आजपासून (२० फेब्रुवारी) सुरू करण्यात आली आहे. या रो-रो बोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी आणि बोटीतून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढ-उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुवर्णदुर्ग शिपींग व मरीन सर्विसेस प्रा. लि. यांच्या मार्फत चालविली जाणाऱ्या या जान्हवी या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवाशी इतकी असणार आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटाचा हा समुद्री मार्ग असणार आहे. ही सेवा ३ महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली असून भरती व ओहोटीच्या वेळी या फेरीबोटीच्या मार्गात बदल होणार असल्याचीं माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाकडून देण्यात आली आहे. आज या समुद्री मार्गातील रो रो सेवेची सुरुवात झाल्यानंतर अनेक स्थानिक नागरिकांनी या बोटीतून प्रवास केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT