Vasai News Electric Bike Saam tv
महाराष्ट्र

Electric Bike: इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई : वसईत चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फ़ोट झाल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत सात वर्षीय चिमुरड्याचा भाजल्याने दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. शब्बीर शाहनवाज अन्सारी असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. (Vasai News Electric Bike)

वसई (Vasai) पूर्वेकडील रामदासनगर येथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी 23 सप्टेंबरला रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान आपल्या (Electric Bike) इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. मात्र पहाटे साडेपाचच्या सुमारास बॅटरीचा भीषण स्फोट झाला. त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले.

उपचारादरम्‍यान मृत्‍यू

शब्बीर हा 70 ते 80 टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असताना या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. स्कुटी कंपनीच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप मृत बालकाच्या कुटुंबियांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT