Vardha News: नंदोरीमध्ये कॉटन इंडस्ट्रीजला आग Saam Tv
महाराष्ट्र

wardha News: नंदोरीमध्ये कॉटन इंडस्ट्रीजला आग; 2000 क्विंटल कापूस जळून खाक,दीड कोटी रुपयांचे नुकसान

ही आग ट्रकच्या सायलेंसरमधून निघालेल्या चिंगारीने लागल्याचे निदर्शनास येत आहे.

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा

Vardha News: समुद्रपूर तालुक्याच्या नंदोरी येथील चोरडीया कॉटन इंडस्ट्रीजमधील कापसाला अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगीत जवळपास दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती आहे. तसेच जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, जाम ते वरोरा मार्गावर गणेशपूर(नंदोरी) येथील चोराडिया कॉटन इंडस्ट्रिसमध्ये दुपारच्या सुमारास कापसाच्या गंजीतून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. कापसाला लागलेली आग विझविण्याची धडपड सुरु झाली. अशातच तेथे कापसाने भरलेला मालवाहू कापूस खाली करण्यासाठी उभा होता.

या आगीने मालवाहू वाहनातील कापसानेही पेट घेतला. त्यामुळे जवळपास दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. दरम्यान, हिंगणघाट येथील अग्निशमन बंबाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, लागलेल्या आगीच्या कारणबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातं आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता आग ही ट्रकच्या सायलेंसरमधून निघालेल्या चिंगारीने लागल्याचे निदर्शनास येते. मात्र, जिनींग मालकाकडून ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नेमकी आग लागली कशाने याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. (Vardha News)

Edit By - Gangappa Pujari

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT