Vande Bharat Express, Latur, Pune, Education Hub saam tv
महाराष्ट्र

Vande Bharat Express: धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चहासोबत कालबाह्य तारखेची बिस्किटे; प्रवाशांचा संताप

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना चहासोबत दिली जाणारी बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची असल्याचा प्रकार समोर आला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur News: मोठा गाजावाजा करून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा बावटा दाखवून सुरू केलेल्या मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सार्वत्रिक कौतुक होत असताना याच गाडीत प्रवाशांना चहासोबत दिली जाणारी बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची असल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात एका प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे आॕनलाईन तक्रारही नोंदविली आहे. (Latest Marathi News)

गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सोलापूर (Solapur) आणि शिर्डीसाठी (Shirdi) वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. संपूर्ण वातानुकूलित, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त, आरामदायी आणि मध्यम जलदगती गाडी म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे सर्वत्र उत्सवी थाटात, वाजत-गाजत स्वागत करण्यात आले होते. प्रवाशांमध्येही याबद्दल समाधानाची भावना व्यक्त होत होती. त्याचबरोबर वंदे भारतला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

याचदरम्यान, दरम्यान,सोलापूरहून मुंबईला (Mumbai) निघालेल्या याच वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट खानपान सेवेचा अनुभव प्रवाशांना आला. नागेश पवार हे सोलापूरहून मुंबईला याच गाडीतून प्रवास करीत होते. एकक तर सकाळी १५ मिनिटे उशिरा वंदे भारत एक्सप्रेसने सोलापूर रेल्वे स्थानक सोडले. पुढे काही वेळातच प्रवाशांना खानपान सेवेचा भाग म्हणून चहा-बिस्किटे देण्यात आली.

परंतु चहासोबत दिलेली बिस्किटे उत्सुकतेपोटी न्याहाळली असता ही बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची आढळून आल्यामुळे प्रवाशांना धक्का बसला. त्याचा अनुभव नागेश पवार या प्रवाशाला प्रत्ययास आला. तेव्हा त्यांनी तेवढ्याच सजगतेने रेल्वे प्रशासनाकडे (Railway) आॕनलाईन तक्रार नोंदविली.

यासंदर्भात पवार यांनी तक्रारीची चित्रफित तयार करून समाज माध्यमातून प्रसारीत केली. यात चहासोबत त्यांना देण्यात आलेल्या बिस्किटाच्या पाकिटावर बिस्किटाची उत्पादन केल्याची तारीख २६ आॕगस्ट २०२२ आहे. कालबाह्य तारीख २५ फेब्रुवारी २०२३ अशी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajra Bhakri Recipe: भाकरी थापायला जमत नाही? मग लाटण्याने बनवा मऊ आणि टम्म फुगणारी बाजरीची भाकरी, सोपी आहे पद्धत

Maharashtra Live News Update: मतदान जागृतीसाठी पीएमपीएमएल कडून अनोखे गीत

Dog Killing Case : निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ

Nail Art : ब्यूटी पार्लरसारखे नेल आर्ट करा आता घरच्या घरी, पाहा डिझाइन

Contrast Saree Blouse : साडीसोबत घाला कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज; सणासुदीला मिळेल परफेक्ट लूक, सगळेच म्हणतील WOW

SCROLL FOR NEXT