Sambhaji Bhide Saam Tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide in Nagpur : वंचितचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडेंचे समर्थक आमने-सामने, दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी

Sambhaji Bhide News : श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचं आज नागपुरात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडे यांचे समर्थक आमने-सामने आले. श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचं आज नागपुरात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर आहे.

मात्र संभाजी भिडे नागपुरात येणार म्हणून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेत विरोध केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला आहे.

गीता मंदिरमध्ये संभाजी भिडे यांचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. वंचित बहुजन आघाडीने संभाजी भिडे यांचा विरोध करण्याचा इशारा दिला होता. यामुळे शिबीर आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस उपस्थित आहेत.

संभाजी भिडे कार्यक्रमस्थळी दाखल होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि संभाजी भिडे यांचे समर्थक आमने-सामने आले. संभाजी भिडे यांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणच्या बाहेर वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. तसेच संभाजी भिडेंना परत जाण्याची मागणी केली. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडूनही जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Holiday: दिल्ली, उत्तर प्रदेशसह या राज्यातील शाळांना १०-१५ दिवस सुट्टी; महारष्ट्रात काय स्थिती?

खंडेरायाच्या चरणी भंडारा उधळताना आग; भंडाऱ्यातील भेसळ पुन्हा ऐरणीवर

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील, विधानसभेच्या माजी उपाध्यक्षांचा दावा|VIDEO

मॉडेल समुद्राच्या किनार्‍यावर देत होती पोझ, अचानक लाट आली अन्... VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT