vaibhav pichad, Raosaheb Wakchaure  saam tv
महाराष्ट्र

Vaibhav Pichad News : 'अमृतसागर' च्या अध्यक्षपदी वैभव पिचड, रावसाहेब वाकचौरे उपाध्यक्ष

पिचड गटाने मविआ व मित्र पक्षाचा दणदणीत पराभव केला हाेता.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Vaibhav Pichad : अकोले तालुक्यातील महत्वाची सहकारी संस्था असणाऱ्या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक आणि प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार वैभव पिचड (vaibhav pichad) यांची निवड झाली आहे. या दूध संघाच्या उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे (raosaheb wakchaure) यांची निवड झाली आहे. या दाेन्ही निवडी बिनविरोध झाल्या आहेत. (Breaking Marathi News)

अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक आणि प्रक्रिया संघाची नुकतीच निवडणुक झाली. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने एकतर्फी विजय संपादन केला होता. या निवडणुकीत महाविकास आघाडी (mva) आणि मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाचा दणदणीत पराभव केला.

या मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर शेतकरी विकास मंडळाने १३ जागांवर नेत्रदीपक यश संपादन केले होते. या दूध संघाच्या अध्यक्षपदाची आणि उपाध्यक्षपदाची निवडणुक (election) बिनविराेध झाली. या दूध संघाच्या अध्यक्षपदी पिचड यांची निवड झाल्याने त्यांच्या राजकारणाला पुन्हा उभारी मिळाली आहे अशी चर्चा तालुक्यात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT