Maval News Saam tv
महाराष्ट्र

Maval : वडगाव मावळ न्यायालयाची उभी राहणार नवीन इमारत; १०९ कोटीचा निधी देण्याचा निर्णय

Maval News : वडगाव मावळ येथील न्यायालयाची नवीन वस्तू उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून होती. यावर बैठक होऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली असून १०९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला

दिलीप कांबळे

मावळ : मावळ तालुक्याच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णपान कोरणारा महत्वाचा टप्पा वडगाव मावळ येथे नोंदवला गेला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, वडगाव मावळ येथे भव्य अशी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी साधारण १०९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वडगाव मावळ येथे न्यायमूर्ती, वरिष्ठ वकील व बार असोसिएशन यांची संयुक्त बैठक आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत नागरिकांच्या न्याय प्रवेशासाठी दीर्घकाळा पासूनची उणीव भासत असलेल्या भव्य १०९ कोटी रुपयांची न्यायालयीन वास्तू उभारणीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यास आमदार सुनील शेळके यांनी देखील निधी उपलब्ध करून देण्यास दुजोरा दिला आहे. 

५० वर्षांचा विचार करून उभारण्यात येणार वस्तू 

कृषी विभागाच्या जागेवर उभारण्यात येणारी ही इमारत पुढील पन्नास वर्षांचा विचार करून आधुनिक व अत्याधुनिक सुविधांसह बांधली जाणार आहे. या भव्य इमारतीमुळे वडगाव मावळ व परिसरातील नागरिकांना त्वरित, सुलभ व पारदर्शक न्याय मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्बल घटकांनाही न्याय मिळविण्यात आत्मविश्वास निर्माण होईल, असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.

योग्य सुविधा उपलब्ध करण्याचा उद्देश 

न्यायालयीन कामकाजात कार्यक्षमता वाढविणे, वकिलांना योग्य सुविधा उपलब्ध करणे आणि सर्वसामान्यांना न्यायालयीन वातावरणात सहज प्रवेश मिळावा; हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबैठकीस आमदार सुनील शेळके, न्यायमूर्ती श्री. डी. के. अनभुले, श्री. आर. व्ही. हुद्दार, श्री. एस. बी. काळे, तसेच ज्येष्ठ वकील व वडगाव मावळ बार असोसिएशनचे संचालक मंडळ उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : गर्दीपासून दूर असलेला मुंबईचा ऐतिहासिक खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हा' किल्ला

वांगणीत चाळ माफियांना दणका; 100 हून अधिक अनधिकृत घरांवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

SCROLL FOR NEXT